logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

Recent Events/Festival

                                                   'मल्हार' भक्तनिवास मध्ये रंगरंगोटी, वॉटर प्रूफिंग, प्लंबिंग व इतर डागडुजी व दुरुस्तीचे काम चालू असल्यामूळे ONLINE ROOM BOOKING बंद ठेवण्यात आले आहे.                                                    रविवार दि17/03/2024 रोजी श्री मार्तंड देवसंस्थान संचलित "म्हाळसा-बाणाई अन्नसेवा कक्ष" येथे साबणे परिवार यांचेकडून साधारण 749 भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.                                                    देवसंस्थानमध्ये देवस्थान हे दान देण्यास कोणत्याही प्रकारची सक्ती किंवा सक्तीने दान करण्याचे समर्थन करीत नाही. श्री मार्तंड देवसंस्थान कोणत्याही कारणासाठी पैशाची सक्ती करीत नाही, अगर कोणी सक्ती केल्यास मा.धर्मादाय सहआयुक्त, पुणे व श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांचेकडे रीतसर तक्रार द्यावी.                                                    सर्व भाविक-भक्तांकरिता देवसंस्थानमार्फत "म्हाळसा-बाणाई अन्नसेवा कक्ष" (गडाच्या पूर्व दरवाजा जवळ) रोज दुपारती झालेनंतर ठीक १ वाजता मोफत अन्नसेवा करण्यात येते, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.                                                    #श्री मार्तंड देवसंस्थानला देणगी देणाऱ्या सर्वधर्मीय भाविकांना #इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळणारे आयकर विभागाचे 80G प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे... तरी भाविकांनी सढळ हाताने दान स्वरूपात देणगी द्यावी व इन्कम टॅक्समध्ये सूट घ्यावी...

History


लवथळेश्वर

जेजुरी नगरीच्या पश्चिम दिशेला सासवड- जेजुरी राज्य मार्गालगत पुरातन लवथळेश्वर नावाचे शिवमंदिर आहे. लव ऋषींनी हे मंदिर स्थापन करून तपश्चर्या केल्याने त्यांच्या नावानेच लवथळेश्वर हे नांव प्रचलीत झाले. मंदिरातील शिवलिंग हे भुगर्भात आहे. श्री समर्थ रामदास स्वामींचे काही काळ येथे व....

Read More

पेशवे तलाव व बल्लाळेश्वर मंदिर

जेजुरीच्या पुर्वेला सुमारे ३६ एकर जागेत जयाद्री डोंगर रांगेच्या पायथ्याशी पहिले बाजीराव पेशवे यांनी १७ व्या शतकाच्या पुर्वार्धात निर्माण केलेला अष्टकोनी दगडी बांधणीचा हा पेशवे तलाव. तलावालगतच बल्लाळेश्वर शिवमंदिराची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी दगडी बांधणीची पुष्करिणी ....

Read More

मल्हार गौतमेश्वर (छत्री) मंदिर व होळकर तलाव

जेजुरी नगराच्या पश्चिम दिशेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी इ. स. १७६२ ते १७७० या कालावधीत सुमारे साडे सतरा एकर जागेत निर्माण केलेला भव्य विस्तीर्ण होळकर तलाव याची दगडी बांधणी व भुमीगत दगडी जलवाहिनी ही वास्तुस्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना आहे. भाविकांच्या सोयीसाठी निर्....

Read More

श्री क्षेत्र कडेपठार

जेजुरी शहराच्या दक्षिण दिशेला सपाटीपासून सुमारे ८०० फुट उंचीवर जयाद्री डोंगररांगेच्या माथ्यावर खंडेरायाचे मुळ स्थान कडेपठार मंदिर आहे. येथे शंकर पार्वतीचे स्वयंभु लिंग असून मार्तंड भैरवाची मुर्ती उग्र रूपात दिसून येते. मंदिर दगडी बांधणीचे असून यावर कुठलाही शिलालेख अथवा शिल्पक....

Read More

महाशिवरात्री उत्सव

माघ कृ. चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्र याच दिवशी वर्षातून माघ केवळ एकदाच जेजुरी गडावरील मुख्य मंदिरातील गाभारा तळघरात असणारे गुप्त मल्लेश्वराचे गुप्तलिंग आणि मंदिराच्या कळसात असणारे शिवलिंग उघडण्यात येते. या महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर जेजुरी गड मंदिरातील स्वर्ग लोकातील (कळ....

Read More

सोमवती अमावास्या

सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे संबोधले जाते. या अमावस्येच्या पर्वकाळामध्ये खंडोबा गडावरून पालखी सोहळा उत्सवमुर्तीसह कहास्नानासाठी वाजत गाजत प्रस्थान ठेवतात. भंडाऱ्याच्या उधळणीत अब्दागिरी, छत्रचामरे, मानाच्या अश्वासह प्रस्थान ठेवलेला हा सोहळा मल्हार गौतमेश्....

Read More

पौष पोर्णिमा

पौष शुद्ध पौर्णिमेला मृग नक्षत्र, सिंह लग्न या शुभमुहुर्तावर सातारा जिल्ह्यातील पाली येथे श्री खंडोबा व म्हाळसादेवी यांचा विवाह झाला. याचीच आठवण म्हणून दरवर्षी या दिवशी जेजुरी येथे यात्रा भरते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पौर्णिमेनिमित्त जेजुरी मध्ये गाढवांच्या खरेदी-विक्रीचा मो....

Read More

चैत्र पोर्णिमा

चैत्र शुद्ध पौर्णिमेला दुसऱ्या प्रहरी, चित्रा नक्षत्र, वसंत ऋतु या शुभदिवशी श्री शंकरांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला. तेव्हापासून दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला खंडोबाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेजुरी नगरीत मोठी यात्रा भरते. विशेषत: या यात्रेस बहुजन बांधव व शेतकरी मोठ्....

Read More

भुलेश्वर

जेजुरीच्या उत्तर दिशेस १८ किमी अंतरावर माळशिरस गावानजिक सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर पुरातन प्राचीन भुलेश्वर शिवालय आहे. पांडवांनी हे मंदिर बांधल्याची अख्यायिका जरी असली तरी १२ व्या शतकातील यादव कालीन राजा रामदेव राय यांनी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. शिवकालीन शतकात मुरा....

Read More

पांडेश्वर

जेजुरीच्या उत्तरपुर्व बाजुस सुमारे १० किमी अंतरावर असलेले पांडेश्वर हे अखंड हिंदुस्थानामध्ये फक्त दोनच ठिकाणी आढळणारे आंध्र प्रदेशातील चेलजी व त्रिविक्रम संस्कृतीमधील साम्यशिवालय. पांडव वनवासात असताना त्यांनी निर्माण केलेले हे शिवमंदिर पांडवेश्वर असे होते, कालओघात त्याला पा....

Read More

गणपूजा

गणपुजा :- आषाढ शु. प्रतिपदेला गणभुजा असते. मणि - मल्ल राक्षसांचा संहार केल्यानंतर श्री खंडेराय कडेपठारी आले. तेव्हा तेहतीस कोटी देव आणि देवगणांनी व ऋषीमुनींनी पुष्पवृष्टी केली व खंडोबाची पुजा केली आणि देवाला भंडारा वाहिला.कडेपठार मंदिरामध्ये रात्री नित्य नेमाची पूजा झालेनंतर मानकर....

Read More

जागरण-गोंधळ व गाठा

कुलदैवत खंडेरायाच्या धार्मिक विधींमध्ये जागरण गोंधळ ही एक मोठी परंपरा आहे. जागरण म्हणजे रात्रभर जागून कुलदैवताच्या चरित्राचे लोकगिते, लोकभुमिका, संवाद, निरूपण अशा मौखिक संस्कारातून वाद्यांच्या साथीने नृत्यासह परंतु श्रद्धात्मक भाविकतेतून उपासकांकरवी (लोककलावंत, वाघ्या मुरळी) ....

Read More

जेजुरीचा मर्दानी मऱ्हाठमोळा दसरा उत्सव

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. प्रथमतः सकाळी मुख्य मंदिरात पाखाळणी, धार्मिक विधी होवून उत्सव मुर्तीना नवीन पोशाख परिधान केले जातात. त्यानंतर सनई चौघड्यांच्या मंगलमय वाद्यात उत्सवमुर्ती बालद्वारीत आणून विधीवत घटस्थापना केली जाते आणि खऱ्या अर्थाने नवर....

Read More

जानाई देवी उत्सव

समस्त जेजुरीकर ग्रामस्थांची जानाई देवी ही ग्रामदेवता समजली जाते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जानाई देवीचे मंदिर आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. मंदिरात रोज सकाळी पुजा आरती व धार्मिक विधी होतात. नवरात्रामध्ये देवीचे घट बसवून नवरात्र उत्सवही साजरा केला जातो. जयाद्....

Read More

दिवटी बुधली व कोटंबा

खंडेरायाच्या कुलधर्म कुलाचार व धार्मिक विधींमध्ये दिवटी बुधलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी अख्यायिका आहे की, युद्धामध्ये मार्तंड भैरवांनी मणी-मल्ल दैत्यांचा वध केल्यानंतर सर्व देवगणांनी मार्तंड भैरवांना रत्नजडीत सिंहासनावर बसविले, सोन्याची रत्नजडित दिपीका (दिवटी) दाखवून (ओव....

Read More

माघ पौर्णिमा

माघ शुद्ध पौर्णिमेस जेजुरी येथे दोन ते तीन दिवसांची मोठी यात्रा भरते. तसेच दर तीन वर्षांनी कोळी समाज बांधव आपापल्या खंडोबा देवाच्या पालख्या घेऊन देवभेटीसाठी जेजुरीत दाखल होतात. कोळीगीतांच्या नृत्यावर नाचत, वाजत, गाजत आणि भंडा-याची उधळण करीत मोठ्या थाटामाटात पालखी देवभेटीसाठी गडा....

Read More

चंपाषष्ठी

 मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला श्री खंडेरायाची घटस्थापना होते. पाहिल्या दिवसापासून सहा दिवसांपर्यंत चालणारा हा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. याला देवदिवाळी असेही म्हणतात. प्रथम दिवशी मुख्य मंदिर आवारात पाखाळणी हा विधी झालेनंतर उत्सवमुर्तीना नवीन पोशाख परिध....

Read More

जेजुरी नगरीचा इतिहास

जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार। मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ।। १२ व्या शतकातील संत नरहरी सोनारांच्या या ओळी... तर १४ व्या शतकातील संत एकनाथ महाराजांच्या ओव्यांमधूनही खंडेरायाची महती व गुणगान झाल्याचे दिसून येते. पुरातन काळापासून भारताची दक्षिण काशी मानल्या जाणा-या जेजुरीचा खंडोबा म्ह....

Read More

श्री म्हस्कोबा श्रीक्षेत्र वीर

जेजुरीपासून २२ किमी अंतरावर पुरंदर तालुका व सातारा जिल्हयाचा हद्दीत दक्षिण दिशेला श्री क्षेत्र वीर असून पुरातन म्हस्कोबा देवाचे दगडी बांधकाम असणारे मंदिर आहे. गर्भगृहात श्रीनाथ व जोगेश्वरीच्या मुर्ती आहेत. हासुद्धा शिवशंकराचाच अवतार समजला जातो. श्रीनाथ हे काशी अथवा सोनोरीचे का....

Read More

Festivals



Daily
Programme

slider

५.०० स.
मंदीर उघडण्याची वेळ

slider

५.० स. ते ६.३० स.
भूपाळी व आरती अभिषेक

slider

१२.३० दु. ते १.३० दु.
दुपारती व अभिषेक

slider

१.३० दु. ते २.३० दु.
आरती झाले नंतर नैवेदय / महाप्रसाद वाटप

slider

९.०० रा.
शेजआरती / अभिषेक व मंदीर बंद

Media


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.