माघ शुद्ध पौर्णिमेस जेजुरी येथे दोन ते तीन दिवसांची मोठी यात्रा भरते. तसेच दर तीन वर्षांनी कोळी समाज बांधव आपापल्या खंडोबा देवाच्या पालख्या घेऊन देवभेटीसाठी जेजुरीत दाखल होतात. कोळीगीतांच्या नृत्यावर नाचत, वाजत, गाजत आणि भंडा-याची उधळण करीत मोठ्या थाटामाटात पालखी देवभेटीसाठी गडावर नेली जाते.
या उत्सवाला शिखरी काठी उत्सवही म्हटले जाते. संगमनेरकर होलम राजाची शिखर काठी , सुपे ता. बारामती येथील खैरे पाटलांची शिखर काठी आणि महाराजा होळकर यांची जेजुरीतील शिखर काठी या तिन शिखरी काठींना विशेष मान आहे. दरवर्षी पौर्णिमेच्या दुस-या दिवशी या तीन शिखरी काठ्यांसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या प्रासादिक शिखरी काठ्या मुख्य मंदिराच्या कळसाला टेकविण्याचा मान आहे. या वर्षी दि. ९ फेब्रुवारी २०२० रोजी माघ पौर्णिमा येत असल्याने जेजुरी येथे मोठी यात्रा भरणार आहे.