खंडोबा गडकोट मंदिर पायरी मार्गावर डागडुजी दुरुस्तीची गरज
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून खंडेरायाचे मुख्यमंदिर - गडकोट आवार - पायरीमार्ग, दिपमाळा, वेशी यांना 9 व्या ते 17 व्या शतकांचा इतिहास आहे. त्या कालावधीत अनेक नामवंत राजे - महाराजे, सरदार, मराठेकालीन घराण्यांनी नवसपुर्तीसाठी येथे बांधकामे केल्याचे उल्लेख आढळून येतात. मात्र काही दिपमाळा, वास्तुंची, वेशींची दुरावस्था होत आहे. पुरातन नगरीतील हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी अबाधित रहावा या हेतूने देवसंस्थान प्रयत्नशील असून पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनातून मुख्य मंदिर, गडकोट आवार, पायरीमार्ग, दिपमाळा, वेशी यांची डागडुजी - दुरुस्ती (ग्राऊटींग, डस्टींग) आदि विकासकामे पुढील काळात सुरु करण्याचा देवसंस्थान विश्वस्त / अधिकारी / कर्मचारी वर्गाचे प्रयत्न सुरु आहे. पुरातत्व विभागातील वास्तु स्थापत्य शास्त्राचे तज्ञ व शासकीय विभागांच्या मार्गदर्शनातून विकासकामांचा आराखडा तयार करण्यात येत आहे.
सुमारे 69 ते 70 कोटी रुपयांचे हे काम असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा मल्हारगड अबाधित / सुस्थितीमध्ये ठेवण्याच्या या कामास भाविकांनी सढळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती.