logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

Special Day
दिनविशेष

  1. सोमवती अमावास्या उत्सव - पालखी सोहळा सकाळी ७ वाजता शेडा देण्यात आला. श्रींच्या उत्सव मूर्तीना दुपारी ११.३० ते १२ चे दरम्यान अंघोळ घालण्यात आली. तसेच नेहमीप्रमाणे रात्री पालखी सोहळा गडकोटात पोहोचला व सोहळ्याची सांगता करण्यात आली.

  2. सालाबादप्रमाणे यंदाचा दसरा उत्सव एकदम उत्साहात व निर्विघ्न पार पडला. सालाबादप्रमाणे खंडा स्पर्धा पार पडल्या व विजेत्यांचा सन्मान देखील करण्यात आला.

  3. #आज शनिवार दिनांक २१/१०/२०२३ रोजी "दसरा उत्सव २०२३" निमित्त समस्त ग्रामस्थ , खांदेकरी- मानकरी, गावकरी ट्रस्ट, व श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्यामध्ये छत्री मंदिर येथे मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते. दसरा उत्सव निर्विघ्न व योग्य नियोजनामध्ये कसा पार पाडायचा याबाबत चर्चा करण्यात आली.

  4. #सालाबाद प्रमाणे आज रविवार दि.15/10/2023 पहाटे भूपाळी पूजा झाल्यानंतर पाखळणी करण्यात आली. #भंडार घरामध्ये ठेवलेल्या सर्व उत्सव मूर्ती मुख्य गाभाऱ्यामध्ये आणण्यात आल्या. तदनंतर उत्सव मूर्ती बालद्वारीमधील घटस्थापनेच्या ठिकाणी विधिवत सनई- चौघडाच्या वादनात नित्यसेवेकरी पुजारी वर्गाकडून आणण्यात आल्या. ठीक 11.30 वाजता घटस्थापना करण्यात आली. #यावेळी विश्वस्त श्री मंगेश घोणे, श्री अनिल सौंदडे, ॲड.पांडुरंग थोरवे, ॲड.विश्वास पानसे, डॉ.राजेंद्र खेडेकर तसेच खांदेकरी मानकरी ट्रस्टचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे तसेच पुजारी सेवेकरी वर्गातून गणेश आगलावे, मिलिंद सातभाई, माधव बारभाई, चेतन सातभाई, ऋषिकेश सातभाई, धनंजय आगलावे, वैभव दीडभाई, अनिल बारभाई, दीपक बारभाई व ग्रामस्थ, मानकरी, नित्य वारकरी, सेवेकरी आदी उपस्थित होते. श्री सेवेकरी गुरुजींनी सालाबाद प्रमाणे विधिवत पूजा केली. #विशेष म्हणजे यावर्षी महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त माननीय महेंद्र महाजन साहेब व धर्मादाय सहआयुक्त माननीय सुधीरकुमार बुक्के साहेब यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

  5. आज मंगळवार दि.२९/०८/२०२३ पासून तीर्थक्षेत्र विकास आराखडा मधील जतन व संवर्धन कामानिमित्त मुख्य गाभारा मधील श्रींच्या सर्व मूर्ती भंडार घर येथे दर्शनसाठी विधिवत पूजा अभिषेक करून ठेवण्यात आलेल्या आहेत.

  6. मंगळवार दि.२९/०८/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी मा.विश्वस्त साहेब, पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली

  7. मंगळवार दि.२२/०८/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी मा.विश्वस्त साहेब, पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली

  8. मंगळवार दि.१५/०८/२०२३ रोजी स्वातंत्र दिनाच्या निमित श्रींच्या दर्शनासाठी श्री खंडोबा मंदिरात भाविकांची जास्त प्रमाणात गर्दी होती.

  9. सोमवार दि.१४/०८/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी मा.विश्वस्त साहेब, पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली

  10. मंगळवार दि.०८/०८/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी मा.विश्वस्त साहेब, पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली

  11. गुरुवार, दि.०३/०८/२०२३ रोजी माननीय विश्वस्त मंडळाची मासिक सभा संपन्न झाली.

  12. मंगळवार दि.०१/०८/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी मा.विश्वस्त साहेब, पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली

  13. रविवार दि.३०/०७/२०२३ रोजी श्रींच्या दर्शनसाठी भाविकांची जास्त प्रमाणात गर्दी होती.

  14. मंगळवार दि.२५/०७/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी मा.विश्वस्त साहेब, पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली

  15. बुधवार दि.१९/०७/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी मा.विश्वस्त साहेब, पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली

  16. सोमवार दि.१७/०७/२०२३ रोजी सोमवती अमावास्या उत्सव २०२३ - पालखी प्रस्थान दुपारी १ वाजता झाले. पहाटेपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. साधारण ४ ते ५ लाख भाविकांनी श्री खंडोबा देवाचे दर्शन घेतले. तर कऱ्हा स्नान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होती.

  17. समस्त ग्रामस्त खांदेकरी मानकरी गावकरी ट्रस्ट, श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी , यांच्यामध्ये आज दिनांक १४/०७/२०२३ रोजी झालेल्या मिटिंगनुसार #सोमवती_सोहळा दिनांक १७/०७/२०२३ #पालखी_प्रस्थान (शेडा) - दुपारी ०१.०० वाजता.... #मार्ग - पायरी मार्गाने खाली नंदी चौक, छत्री मंदिर, जानुबाई मंदिर, धालेवाडी मार्गे क-हा नदी. #उत्सवमुर्तींना_स्नान - सोहळा क-हा नदीवर पोहचल्यावर दुपारी...... #परतीचा_मार्ग - धालेवाडी गाव, कोरपड मळा, विद्यानगर मार्गे जानुबाई मंदिर येथे विसावा. तिथुन रात्री मारुती मंदिर, महाद्वार पेठेतुन पायरी मार्गाने गडावर... #रोजमारा - देव बसल्यावर (सोहळा संपल्यानंतर).

  18. श्री खंडोबा देवाचा सोमवाती अमावास्या पालखी सोहळा २०२३ निमित्त न्यासाचे विश्वस्त व अधिकारी तसेच श्री खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी व समस्त ग्रामस्थ यांची सभा "गौतमेश्वर छत्री मंदिर" या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये पालखी सोहळ्याचे नियोजन कशाप्रकारे असेल पालखी सोहळा किती वाजता निघेल व परत गडावर केव्हा येईल या सर्वावर चर्चा करून योग्य ते निर्णय घेण्यात आले.

  19. मंगळवार दि.११/०७/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी मा.विश्वस्त साहेब, पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली

  20. आज दि.०३/०७/२०२३ रोजी नवनियुक्त मा.विश्वस्त मंडळाची मासिक सभा आयोजित करण्यात आलेली होती तसेच मा.विश्वस्त मंडळ व सेवेकरी यांची ओळख व्हावी या हेतूने बैठक आयोजित करण्यात आलेली होती.

  21. मंगळवार दि.०४/०७/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी मा.विश्वस्त साहेब, पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली

  22. दि.२९/०६/२०२३ रोजी आषाढी एकादशी असल्याने श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी वारकरी बांधवांची गर्दी होती.

  23. मंगळवार दि.२७/०६/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी मा.विश्वस्त साहेब, पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली

  24. मंगळवार दि.२०/०६/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी मा.विश्वस्त साहेब, पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली

  25. दि.१६/०६/२०२३ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळ्याचे न्यासातर्फे भंडार उधळून स्वागत करण्यात आले व वारकरी बांधवाना श्री खंडेरायाचा बुंदी प्रसाद वाटप करण्यात आला. श्री खंडोबा मंदिरामध्ये वारकरी बांधवांनी दर्शनासाठी लाखोच्या संख्येने हजेरी लावली.

  26. रविवार दि.२८/०५/२०२३ रोजी लग्नसराई व सुट्ट्यांमुळे श्रींच्या दर्शनसाठी भाविकांची खूप मोठ्या संख्येने गर्दी होती.

  27. मंगळवार दि.२३/०५/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली.

  28. रविवार दि.२१/०५/२०२३ रोजी लग्नसराई व सुट्ट्यांमुळे श्रींच्या दर्शनसाठी भाविकांची जास्त प्रमाणात गर्दी होती.

  29. बुधवार दि.१७/०५/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली.

  30. रविवार दि.१४/०५/२०२३ रोजी लग्नसराई व सुट्ट्यांमुळे श्रींच्या दर्शनसाठी भाविकांची जास्त प्रमाणात गर्दी होती.

  31. मंगळवार दि.०९/०५/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली.

  32. रविवार दि.०७/०५/२०२३ रोजी श्रींच्या दर्शनसाठी भाविकांची जास्त प्रमाणात गर्दी होती.

  33. मंगळवार दि.०३/०५/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली.

  34. सोमवार दि.०१/०५/२०२३ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शासकीय सुट्टी असल्याने गडावर भाविकांची जास्त प्रमाणात गर्दी होती.

  35. रविवार दि.३०/०४/२०२३ रोजी श्रींच्या दर्शनसाठी भाविकांची जास्त प्रमाणात गर्दी होती

  36. मंगळवार दि.२५/०४/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली.

  37. रविवार दि.२३/०४/२०२३ रोजी श्रींच्या दर्शनसाठी भाविकांची जास्त प्रमाणात गर्दी होती.

  38. * शुक्रवार दि.२१/०४/२०२३ मुख्य गाभारा पाखाळणी * - हिंदू महिन्याप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुद्ध प्रतिपदेला सकाळी भूपाळी पूजा झालेनंतर मुख्य गाभारा स्वच्छ धुवून सर्व उत्सव मूर्ती सह श्री मार्तंड भैरवांची विधिवत पूजा-अभिषेक करून नवीन पोशाख परिधान केला जातो. (सदरील नवीन पोशाख पुढील महिन्याच्या पाखाळणीवेळी बदलला जातो.)

  39. मंगळवार दि.१८/०४/२०२३ रोजी मुख्य गाभारा (50%) दानपेटी मोजणी पुजारी आठवडेकरी, तलाठी भाऊसाहेब व देवसंस्थान सेवेकरी यांचे उपस्थिती मध्ये करण्यात आली.

  40. शुक्रवार दि.१४/०४/२०२३ रोजी श्री खंडोबा मंदिर गडकोटामध्ये सन्माननीय सुधीरकुमार बुक्के साहेब, धर्मादाय सहआयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी सर्व सेवेकऱ्यांची मिटिंग आयोजित करून योग्य त्या सूचना व मार्गदर्शन केले.

}

Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.