logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

TEMPLE INFORMATION
खंडोबाची माहिती

श्री मल्हारी मार्तंड प्रसन्न

खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. प्रामुख्याने मराठा, रामोशी (नाईक), धनगर समाजचे लोकांचे कुलदैवत मानले जाते. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे); कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र , चतुर्भुज, कपाळाला भंडारा असे रूप आहे . मणी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्रीमार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायम स्वरूपी वास्तव्य केले ते जागृत स्थान म्हणजे जेजुरगड. याठिकाणी श्रीखंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथील वैभव भव्यदिव्य आहे, मल्लासूराचा संहार केल्या नंतर त्यने मागितलेल्या वरामुळे देवाच्या अगोदर मल्ला चे नाव घेतले जाते तर मानिसुराला दिलेल्या वरामुळे दोघा दैत्य बंधूंना देवाच्या सानिध्यात राहता आले ते या जेजुरी गडावर. जेजुरी गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे पंच्याहत्तर मीटर उंचीवर मल्हारी-मार्तंडाचे मंदिर आहे. मंदिराला पूर्व, पश्चिम व उत्तर अशा तीनबाजूनी पायरीमार्गांनी जाता येते. त्यापैकी पूर्व व पश्चिमेकडील पाय-या अरुंद व अर्धवट बांधकाम स्थितील असल्याने त्यांचा वापर सहसा होत नाही.उत्तर दिशेकडील पायरी मार्ग रुंद व रहदारीचा असल्याने या पायरी मार्गाची शोभा अनेक भाविक भक्तांच्या नवस पुर्तीतून निर्माण झालेल्या कमानी व दीपमाळांनी वाढविली आहे. या पायरी मार्गावर तीनशे पंच्याऐंशी पाय-या आहेत तर सुस्थितील चौदा कमानी व छोट्या मोठ्या तीनशे दीपमाळा आहेत. नुसार या मार्गावर अठरा कमानी असल्याचा उल्लेख आढळतो याचाच अर्थ अठरापैकी चार कमानी सव्वाशे वर्षात नाहीशा झाल्या त्यापैकी दोन कमानी भग्न अवस्थेत पहावयास मिळतात. जेजुर गडाला नवलाख पायरीचा उल्लेख अनेक लोकगीतांमधून येत असल्याने अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होते, परंतु गड बांधणी दरम्यान वारण्यात आलेल्या चिरा ( दगड ) संदर्भात हा उल्लेख आलेला आहे. पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांचा पुतळा व वीरभद्र, बानुबाई मंदिर, हेगडी प्रधान, यशवंतराव इ. अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात. महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंचच उंच चार भव्य दीपमाळा व मुख्य श्रीखंडोबा-म्हाळसा मंदिर. दीपमाळांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती पहावयास मिळते, तर त्याचे समोरच दगडी बांधकामातील गाडी बगाड पहावयास मिळते.त्याच्याच पुढे पश्चिमेकडे मंदिराकडे तोंड असलेल्या नंदीपुढे पितळी कासव दिसते, बहुदा सर्व हिंदू मंदिरात कासव पहावयास मिळते परंतु इतके भव्य सहा मीटर व्यासाचे कासव फक्त जेजुरीतच दिसते. त्यापुढे चार पाया-या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो,प्रथम लागते ती सदर, या ठिकाणी उजव्या हाताला उत्तरेकडे उंचावर दोन घंटा बांधलेल्या आहेत. सदरेवरून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी साडेचार फुट उंचीचा चांदीचा दरवाजा लागतो. मध्य गर्भगृहात उत्तर व दक्षिण दिशेस दोन दगडी घोडे दिसतात पैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबाची मूर्ती दिसते. तसेच उत्तर व दक्षिण बाजूस दोन दरवाजे दिसतात त्यापैकी गर्दीच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दरवाजाचा वापर केला जातो. जेजुर गडाला नवलाख पायरीचा उल्लेख अनेक लोकगीतांमधून येत असल्याने अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होते, परंतु गड बांधणी दरम्यान वारण्यात आलेल्या चिरा ( दगड ) संदर्भात हा उल्लेख आलेला आहे. पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांचा पुतळा व वीरभद्र, बानुबाई मंदिर, हेगडी प्रधान, यशवंतराव इ. अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात. महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंचच उंच चार भव्य दीपमाळा व मुख्य श्रीखंडोबा-म्हाळसा मंदिर. दीपमाळांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती पहावयास मिळते, तर त्याचे समोरच दगडी बांधकामातील गाडी बगाड पहावयास मिळते.त्याच्याच पुढे पश्चिमेकडे मंदिराकडे तोंड असलेल्या नंदीपुढे पितळी कासव दिसते, बहुदा सर्व हिंदू मंदिरात कासव पहावयास मिळते परंतु इतके भव्य सहा मीटर व्यासाचे कासव फक्त जेजुरीतच दिसते. त्यापुढे चार पाया-या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो,प्रथम लागते ती सदर, या ठिकाणी उजव्या हाताला उत्तरेकडे उंचावर दोन घंटा बांधलेल्या आहेत. सदरेवरून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी साडेचार फुट उंचीचा चांदीचा दरवाजा लागतो. मध्य गर्भगृहात उत्तर व दक्षिण दिशेस दोन दगडी घोडे दिसतात पैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबाची मूर्ती दिसते. तसेच उत्तर व दक्षिण बाजूस दोन दरवाजे दिसतात त्यापैकी गर्दीच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दरवाजाचा वापर केला जातो. !! यळकोट यळकोट जय मल्हार !!

!! यळकोट यळकोट जय मल्हार !!


News

#सोमवती अमावास्या २०२३ पेपर कात्रण # संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२३ #चैत्र पोर्णिमा २०२३ "म्हाळसा बाणाई अन्नसेवा कक्ष" रंगपंचमी उत्सव २०२३ सोमवती अमावास्या उत्सव २०२३ महाशिवरात्री उत्सव २०२३ माघ पोर्णिमा उत्सव २०२३ #इन्कम टॅक्स मध्ये सूट मिळणारे आयकर विभागाचे 80G प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे... मोबाईल वरून देणगी देणेकरिता कोड देवसंस्थान मार्फत कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना कोरोना या भयंकर रोगाचे सावट असल्या कारणाने सोमवती अमावास्या पालखी सोहळा रद्द #मा.ना.छगन भुजबळ साहेब, (मंत्री - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण). यांनी आज श्री खंडेराया चरणी पूजा अभिषेक केला. माघ पोर्णिमा वर्तमान पत्र कात्रणे चंपाषष्ठी उत्सव २०१९ सांगता... (वर्तमानपत्र कात्रण) चंपाषष्ठी उत्सव -२०१९ (वर्तमानपत्र कात्रण). महाराष्ट्रभरात खंडेरायाच्या करोडोच्या बागायती शेतजमिनी. आमदार मा.अशोकराव चव्हाण व आमदार मा.संजयजी जगताप यांची जेजुरी गडाला भेट जेजुरी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराला जेजुरी गडाच्या महाद्वाराची प्रतिकृती सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रेला सुरुवात १७ तास रंगला जेजुरीचा मर्दानी दसरा जेजुरी गडावर दसरा उत्सवाची तयारी खंडोबा गडावर विद्युत रोषणाई दसरा उस्तवा निमित्त जेजुरी गड नवरात्र उत्सव प्रारंभ सकाळ-जेजुरीच्या उत्सवाची परदेशातही भुरळ लोकमत : २०१७ सालातील जगातील सर्वोत्कृष्ट फोटो मराठी महिन्याप्रमाणे दिनदर्शिका आंतरराष्ट्रीय स्पर्धे मध्ये क्र.१ आलेले छायाचित्र गणेशोत्सव २०१९ दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणे वाटप कोल्हापूर जिल्हा पूरग्रस्त गाव घेणार दत्तक वाडी वस्तीना पिण्याचे पाणी पुरविले दुष्काळ ग्रस्त गावांना पाणी वाटप दसरा उत्सव सामुदायिक विवाह सोहळा श्री खंडोबा - श्रीमंत देव मंदिरामध्ये हरविलेल्या मुलीला तिच्या घरी सोडले दर्शनाकरिता आलेल्या अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप मतदान जनजागृती कार्यक्रम कळस पूजन सोन्याचा कळस पूजन गावदेवी जानाई मंदिर जीर्णोद्धार डायलेसिस खर्च फक्त 100 रुपये डायलेसिस सेंटर डायलेसिस सेंटर उद्घाटन शिखर काठी छत्रपती शिवाजी राजे जयंती उत्सव २०१९ रंगपंचमी २०१९ ज्ञानेशवर महाराज पालखी सोहळा २०१८ महाशिवरात्र २०१९ माघ पोर्णिमा मंदिर माघ पोर्णिमा नेत्रदीपक किरणोत्सव गणेशोत्सव २०१८ चंपाषष्ठी विशेष देव दिवाळी अर्थात चंपाषष्ठी सहधर्मादाय आयुक्त सो ,पुणे यांची भेट चंपाषष्ठी घटस्थापना चंपाषष्ठी उत्सव २०१८ सोमवती यात्रा जून २०१९ तेलहंडा नवरात्री निमित्त विद्युत रोषणाई विकास आराखडा चर्चा वृक्षारोपण भाविक भक्तांनी देणगी दान केलेली जुनी नाणी 200 वर्षापूर्वीची नाणी सन २०१९ विवाह सोहळा विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे पाटील साहेब भेट लग्नसराई मुळे नव वधू -वर दर्शनासाठी गर्दी क्षेत्र कडेपठार गणपुजा तीर्थक्षेत्र विकास आराखडा चर्चा बाबासाहेब आंबेडकर जयंती


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.