१) रूम घेताना आपले ओळखपत्र देणे बंधनकारक राहील .
२) रूम चेक इन ची वेळ दुपारी १२ नंतर राहील.
३) रूममध्ये स्वयंपाक करण्यास सक्त मनाई आहे .
४) आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई घेतली जाईल .
५) आपल्या मौल्यवान वस्तू आपल्या जबाबदारी वर सांभाळा, आपली कोणतीही वस्तू गहाळ झाल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
६) मल्हार भक्तनिवास आवारात व रूम मध्ये कोणतेही वाद्य वाजवण्यास/लावणेस सक्त मनाई आहे.
७) भक्तनिवास मध्ये धुम्रपान व मध्यपान करण्यास सक्त मनाई आहे.
८) आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व शांतता राखावी .
९) गरम पाण्याची वेळ पहाटे ४ ते ७ राहील. गरम पाण्याची व्यवस्था कॉमन पॉईंटवर केलेली आहे.
१०) सोलर यंत्रणा असल्यामुळे पावसाळ्यामध्ये जसे पाणी गरम होईल तसे घ्यावे लागेल.
११) बाहेर जाताना रूम मधील सर्व विद्युत उपकरणे व पाण्याचे नळ बंद करणे बंधनकारक राहील.
१२) रूम सोडण्याची वेळ दुपारी १२ वाजता राहील व त्यानंतर आपल्याला वेगळे सुविधा शुल्क आकारण्यात येईल.
१३) भक्तनिवास हे आपल्या सोईकरता आहेच, परंतु आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
१४) सिंगल रूममध्ये फक्त २ बेड/रजई व डबल रुममध्ये फक्त ३ बेड/रजई उपलब्ध होतील.
१५) फक्त परिवारास रूम दिली जाईल. एका व्यक्तीस व अविवाहित व्यक्तीस रूम दिली जाणार नाही.
१६) निवासास आलेल्या सर्व व्यक्तींचे ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक आहे.
१७) सोमवती अमावास्या/ माही पोर्णिमा यात्रेचे सलग ३ दिवसाचे रूम बुकिंग बंधनकारक आहे. (सोमवती - शनिवार/रविवार/सोमवार – रूम सोडणे मंगळवारी दुपारी १२ वा.)
१८) भक्तनिवास मध्यवर्ती गावामध्ये असल्यामुळे चार चाकी पार्किंगची सोय नाही, तरी आपली वाहने खाजगी पार्किंग मध्ये लावावी लागतील.
१९) रूम ताब्यात घेतेवेळी रु.४०० डीपॉजिट स्वरुपात जमा करावे लागतील.ते तुम्हाला रूम सोडते वेळी मिळतील.
२०) एकदा रूम बुक झालेनंतर सुविधा शुल्कपरत मिळणार नाही. व रूम बुकिंग रद्द होणार नाही.
२१) सिंगल रूम मध्ये - २ व्यक्ती
२२) डबल रूम मध्ये - ३ व्यक्ती
कृपया सूचनांचे पालन करावे ही विनंती...