अमावस्येच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच शु. प्रतिपदेला सकाळचे सुमारास खंडोबा मंदिराचा मुख्य गाभारा स्वच्छ धुऊन उत्सव मुर्तींसह मुख्य मार्तंड भैरवनाथाची विधीवत पुजा करुन त्यांना नवा पोषाख परिधान केला जातो. या धार्मिक विधीवत पुजा - अभिषेकाला पाखाळणी असे म्हणतात.