logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

पेशवे तलाव व बल्लाळेश्वर मंदिर

जेजुरीच्या पुर्वेला सुमारे ३६ एकर जागेत जयाद्री डोंगर रांगेच्या पायथ्याशी पहिले बाजीराव पेशवे यांनी १७ व्या शतकाच्या पुर्वार्धात निर्माण केलेला अष्टकोनी दगडी बांधणीचा हा पेशवे तलाव. तलावालगतच बल्लाळेश्वर शिवमंदिराची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी दगडी बांधणीची पुष्करिणी आहे. विशेष म्हणजे तलावातील पाणी दगडी दट्ट्या फिरविला की, थेट शिवमंदिरातील पुष्करिणीमध्ये येते व तेथून शेती सिंचनासाठी विनासायास घेता येते. वास्तुस्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ठ नमुना असलेली दगडी  जलवाहिनी, पाणी योजना आजही सुस्थितीत पहावयास मिळते. येथील परिसराला व लोकवस्तीला जुनी जेजुरी असे संबोधले जाते. गटकोटावर जाण्यासाठी पुर्व दिशेला पायरी मार्ग व गडकोटाला प्रवेशद्वार आहे. आपत्कालीन कालावधीमध्ये वाहन गडावर जाणे- येणेसाठी कच्चा घाटरस्ताही निर्माण झाला आहे. सुमारे ३६ एकरांचा हा तलाव आहे.


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.