logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

मल्हार गौतमेश्वर (छत्री) मंदिर व होळकर तलाव

जेजुरी नगराच्या पश्चिम दिशेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी इ. स. १७६२ ते १७७० या कालावधीत सुमारे साडे सतरा एकर जागेत निर्माण केलेला भव्य विस्तीर्ण होळकर तलाव याची दगडी बांधणी व भुमीगत दगडी जलवाहिनी ही वास्तुस्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना आहे. भाविकांच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या तलावालगतच धर्मनिष्ठ दानशूर अहिल्यादेवींनी ऐतिहासिक चिंचेच्या बागेचीही निर्मिती केली होती. मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर हे होळकर राज्यसत्तेचे संस्थापक मल्हारराव होळकर व त्यांच्या पत्नी गौतमीबाई यांचे स्मारक आहे. विठोजी होळकर व तुकोजी होळकर यांनी हे मंदिर निर्माण केल्याचे शिलालेख आहेत. मुख्य मंदिरात शिवलिंग असून त्या मागे ऐतिहासिक होळकर तलाव मल्हारराव होळकर यांचेसह त्यांच्या पत्नी अनुक्रमे गौतमीबाई, द्वारकाबाई, व बनाबाई यांच्या मुर्ती आहेत. तर मंदिराच्या बाजुलाच द्वारकाबाई व बनाबाई यांचे दोन घुमट मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या बाहेर आवारात असणारा दगडी नंदी हा भाविकांचे लक्ष वेधून घेतो.


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.