logo

श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी

श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे ४१२३०३

गणपूजा

गणपुजा :- आषाढ शु. प्रतिपदेला गणभुजा असते. मणि - मल्ल राक्षसांचा संहार केल्यानंतर श्री खंडेराय कडेपठारी आले. तेव्हा तेहतीस कोटी देव आणि देवगणांनी व ऋषीमुनींनी पुष्पवृष्टी केली व खंडोबाची पुजा केली आणि देवाला भंडारा वाहिला.कडेपठार मंदिरामध्ये रात्री नित्य नेमाची पूजा झालेनंतर मानकरी देवावर भंडार वाहतात त्यापाठोपाठ सर्व भक्तमंडळी भंडार वाहतात अशा पद्धतीने स्वयंभू लिंगावर भंडाराच्या राशी उभ्या राहतात त्यानंतर देवाची आरती होऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी छबिना निघतो तो रात्रभर दिवटीच्या प्रकाशात व सनईच्या मंजुळ स्वरामध्ये चालतो. वाघ्या मुरुळी तसेच इतर स्थानिक कलाकारांच्या दृष्टीने महत्वाचा दिवस असल्याने प्रत्येकजण आपल्या परीने देवापुढे आपली कला सादर करतात. छबिना मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी देवाचे भंडार भाविक भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.
 


Following items are strictly disallowed in and around the temple premises and can attract penal action in case of violations.