Khandoba Bhupali


खंडोबा भूपाळी

मल्हारी कवच

ll श्री गणेशाय नमः ll अस्यश्रीमल्लारीकवचमंत्रस्य l स्कंदऋषिः l श्रीमल्हारीदेवता l अनुष्ठुपछंदःl श्रीमल्लारीकवचजपेविनियोगःll सनत्कुमार उवाच l मुनीनां सप्तकोटीनां l वरदं भक्तवत्सलम l दुष्ट मर्दन देवेशं l वंदेहं म्हाळसापतिम ll अनुग्रहाय देवानां l मणिरत्नगिरौस्थितं l प्रसन्नवदनं नित्यं l वंदेहं मल्ल वैरिणं ll सर्वदेवमयं शांत l कौमारं करुणाकरं l आदिरुद्र महारुद्र l वंदेहं सवित्वकप्रियम ll भुक्तीमुक्ती प्रदं देवं l सर्वाभरणभूषितं ll कोटिसूर्यप्रतीकाशं l वंदेहं असुरांतकं ll आदिदेवं महादेवं l मल्लारी परमेश्वरम l वीरस्त्वस्त्याविरुपाक्षं l वंदेहं भक्तवत्सलं ll भोगरूपपरं ज्योतिः l शिरोमाला विभूषितं l त्रिशलादिधरं देवं l वंदेहं लोकरक्षकं ll इदं पठति यो भक्त्या l मल्लारी प्रतिकारकं l भक्तानां वरदं नित्यं l प्रणतोस्मिमहेश्वरं ll वने रणे महादुर्गे l राजचौर भयोप्युत l शाकिनीडाकिनीभूत l पिशाचोरगराक्षसःl ग्रहपिडासु रोगेषु l विषसर्पभयेषुच ll सदा मल्लारीमल्लारी l मल्लारीतिकीर्तनं l सप्तजन्मकृतं पापं l तत्क्षणादेव नश्यति ll त्रिकालेतु पठे नित्यं l विष्णू लोकंस गच्छंती l देहांतेतु तप्राप्नोती l सर्व लोके महीयते ll इति श्रीब्रह्मांडपुराणे l क्षेत्रखंडे मल्लारीमहात्मे l मल्लारीकवचं संपूर्णम ll

मल्हारी सप्तक

मलूराया तवशरणं l मलूनाथा तवशरणं l त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवन पालका तवशरणं ll १ ll शाश्वतमुर्ते तवशरणं l पितसुंदरा तवशरणं l पंचानना हयवाहना शेषभूषणा तवशरणं ll २ ll चतुर्भुजमुर्ते तवशरणं l लिंगद्वयरूपेण तवशरणं l खड्ग,त्रिशूळा,डमरू,पात्रधरा तवशरणं ll ३ ll करुणानिधी तवशरणं l करुणासागरा तवशरणं l श्रीमैलारा, शिवमैलारा, खड्गधरा तवशरणं ll ४ ll म्हाळसानाथा तवशरणं l बाणाईनाथा तवशरणं l जयाद्रीनाथा, पेंबरनाथा, मणीचूलनाथा तवशरणं ll ५ ll कृपामुर्ते तवशरणं । कृपासागरा तवशरणं । कृपाकटाक्षा, कृपावलोकना कृपानिधे प्रभू तवशरणं ll ६ ll भक्तपालका तवशरणं l भक्तरक्षका तवशरणं l भक्तवत्सला भक्तोदधारा भक्तदयाळा तवशरणं ll ७ ll

॥ॐ मार्तंडाय नमः॥ ॥ॐ त्र्यंबकाय नमः॥ ॥ॐ महादेवाय नमः॥ ॥ॐ जदीश्वराय नमः॥ ॥ॐ त्रिपुरारये नमः॥ ॥ॐ जटाजूटाय नमः॥ ॥ॐचंदनभूषणाय नमः॥ ॥ॐ चंद्रशेखराय नमः॥ ॥ॐ गौरी प्राणेश्वराय नमः॥ ॥ॐ जगन्नाथाय नमः॥ ॥ॐ महारूद्राय नमः॥ ॥ॐ भक्तवत्सलाय नमः॥ ॥ॐ शिववरदमूर्तये नमः॥ ॥ॐ गिरीजापतये नमः॥ ॥ॐ पशुपतये नमः॥ ॥ॐ कौर्पूरगौराय नमः॥ ॥ॐ शंकराय नमः॥ ॥ॐ सर्पभूषणाय नमः॥ ॥ॐ असूरमर्दनाय नमः॥ ॥ॐ ज्ञानदाकाय नमः॥ ॥ॐ त्रिमूर्तये नमः॥ ॥ॐ शिवाय नमः॥ ॥ॐ मार्तंडभैरवाय नमः॥ ॥ॐ नागेंद्रभूषणाय नमः॥ ॥ॐ नीलकंठाय नमः॥ ॥ॐचंद्रमौलये नमः॥ ॥ॐलोकपालाय नमः॥ ॥ॐ देवेंद्राय नमः॥ ॥ॐ नीलग्रीवाय नमः॥ ॥ॐ शशांकचिन्हा नमः॥ ॥ॐ वासुकीभूषणाय नमः॥ ॥ॐदुष्टमर्दनदेवेशाय नमः॥ ॥ॐउमावराय नमः॥ ॥ॐ खङ्‍गराजाय नमः॥ ॥ॐ मृडानीवराय नमः॥ ॥ॐ पिनाकपाणये नमः॥ ॥ॐ दशवक्त्राय नमः॥ ॥ॐ निर्विकाराय नमः॥ ॥ॐ शूलपाणये नमः॥ ॥ॐजगदीशाय नमः॥ ॥ॐ त्रिपुरहराय नमः॥ ॥ॐ हिमनगजामाताय नमः॥ ॥ॐ खङ्‍गपाणये नमः॥ ॥ॐव्योमकेशाय नमः॥ ॥ॐत्रिशूलधारये नमः॥ ॥ॐ धूर्जटये नमः॥ ॥ॐत्रितापशामकाय नमः॥ ॥ॐअनंगदहनाय नमः॥ ॥ॐ गंगाप्रियाय नमः॥ ॥ॐ शशिशेखराय नमः॥ ॥ॐ वृषभध्वजाय नमः॥ ॥ॐ प्रेतासनाय नमः॥ ॥ॐचपलखङ्‍गधारणाय नमः॥ ॥ॐकल्मषदहनाय नमः॥ ॥ॐ रणभैरवाय नमः॥ ॥ॐ खङ्‍गधराय नमः॥ ॥ॐ रजनीश्वराय नमः॥ ॥ॐ त्रिशूलहस्ताय नमः॥ ॥ॐ सदाशिवाय नमः॥ ॥ॐकैलासपतये नमः॥ ॥ॐपार्वतीवल्लभाय नमः॥ ॥ॐ गंगाधराय नमः॥ ॥ॐ निराकाराय नमः॥ ॥ॐ महेश्वराय नमः॥ ॥ॐ वीररूपाय नमः॥ ॥ॐ भुजंगनाथाय नमः॥ ॥ॐ पंचाननाय नमः॥ ॥ॐ दंभोलिधराय नमः॥ ॥ॐ मल्लांतकाय नमः॥ ॥ॐ मणिसूदनाथ नमः॥ ॥ॐ असुरांतकाय नमः॥ ॥ॐ संग्रामवरीराय नमः॥ ॥ॐ वागीश्वराय नमः॥ ॥ॐ भक्तिप्रियाय नमः॥ ॥ॐ भैरवाय नमः॥ ॥ॐ भालचंद्राय नमः॥ ॥ॐ भस्मोद्धाराय नमः॥ ॥ॐ व्याघ्रांबराय नमः॥ ॥ॐ त्रितापहाराय नमः॥ ॥ॐभूतभव्यत्रिनयनाय नमः॥ ॥ॐ दीनवत्सलाय नमः॥ ॥ॐ हयवाहनाय नमः॥ ॥ॐ अंधकध्वंसये नमः॥ ॥ॐ श्रीकंठाय नमः॥ ॥ॐ उदारधीराय नमः॥ ॥ॐमुनितापशमनाय नमः॥ ॥ॐ जाश्वनीळाय नमः॥ ॥ॐ गौरीशंकराय नमः॥ ॥ॐ भवमोचकाय नमः॥ ॥ॐ जगदुद्धाराय नमः॥ ॥ॐ शिवसांबाय नमः॥ ॥ॐ विषकंठभूषणाय नमः॥ ॥ॐमायाचालकाय नमः॥ ॥ॐपंचदशनेत्रकमलाय नमः॥ ॥ॐ दयार्णवाय नमः॥ ॥ॐ अमरेशाय नमः॥ ॥ॐ विश्वंभराय नमः॥ ॥ॐकालाग्निरूद्राय नमः॥ ॥ॐ मणिहराय नमः॥ ॥ॐ मालूखानाथ नमः॥ ॥ॐजटाजूटगंगाधराय नमः॥ ॥ॐ खंडेराय नमः॥ ॥ॐ हरिद्राप्रियरूद्राय नमः॥ ॥ॐ हयपतये नमः॥ ॥ॐ मैराळाय नमः॥ ॥ॐ मेघनाथाय नमः॥ ॥ॐअहिरूद्राय नमः॥ ॥ॐ म्हाळसाकांताय नमः॥ ॥ॐ मार्तंडाय नमः॥

भूपाळी

प्रातःकाळी उठूनी गणपतीचे, करि विष्णू स्मरण काशी उज्जैनी, औंढी परळी, त्र्यंबक त्रिनयन सोमनाथ सोरटी, बद्रिकेदार रामेश्वरी स्नान श्रीशैल्य मल्लिकार्जुन, वेरूळ मांधाता जाण आत्मलिंग गोकर्ण तारिले, चांडाळी विघ्न भक्त अलभ्या ऋषी, स्मरावे दत्त हनुमान मोक्षांच्या पु-या सात, हरिद्वार कांची पहा द्वारका जगन्नाथ, पंचवटीत क्षणभरी रहा गंगोत्री कुशावर्त, जळ निर्मळ गंगा न्हा विठ्ठल चरणी वाहू तुळसी, भक्त करील साह्य सगनभाऊ मारुतीस म्हणती, नाथ प्रसन्न आहे रूपतेज दीपतेज, रवी उदयास्तव येऊ पाही सगनभाऊ मारुतीस म्हणती, नाथ प्रसन्न आहे २ वृक्ष बकुळे वरती पक्षी रावे गजबजती कागांचा कलकलाट, द्वारी चिमण्या चिवचिवती बक ते तळ्यापाशी, कोकिळा आंबेवनी राहती उंच वृक्षावर तास पिंगळे, मोर ठाय करती कुंभ घेउनिया शिरी, देवांगना पाण्याला जाती कागापूर जेजुरी, शुद्ध सतरावी क-हा वाहती लेप सुगंधीत उटणे, बानू म्हाळसा लाविती घंगाळी उष्ण उदक, देव चौरंगी न्हाती पिवळे पितांबर कस्तुरी टिळा लेती उभी फुलाई माळीन, गळा हार घालिती एक मालावती मुरुळी, गुण आवडीने गाती रंभाई शिंपीण बरवी, शेल्याला दोरा बरवी अलंकार पिवळे, अंगावर शाल जोडी पिवळी दिले चंदनाचे पाट बसाया, घालिती रांगोळी उठी लवकर मलुराय, म्हाळसा बोले प्रातःकाळी उटणे मी लाविते तुम्हाला, सण आज दिपवाळी ३ छत मंडप झालरी फुलांचे, पडदे मंदिरी सुरुंचे ठायी ठायी उदबत्त्या द्वारी, सुगंधीत सारे ऐनेमहाल चमचमा चमकती, हंडया बिलवरी घ्या दिवटी जळे मशाल, पडला प्रकाश महाद्वारी अंगणात दीपमाळा पेटल्या, आगीन झाडी चारी ऐनेमहाल लखलखा झळकतो, कळस सोनेरी सडे सुगंधीत अंगणे, वर रांगोळ्या पाट हरोहर समया जळती, ऋषी पंक्तीचा थाट बानू म्हाळसा वाढती, हाती सोन्याचे ताट अमृत फळ नारंगी, गोड द्राक्षे अंजीर केळी पुढे तबकामध्ये आणून ठेविती, मालावती मुरुळी उठी लवकर मलुराय, म्हाळसा बोले प्रातःकाळी उटणे मी लाविते तुम्हाला, सण आज दिपवाळी. ४ सुगंधीत मुखी विडे रत्न, लांबची प्रभा दिसती भरगच्चे पोशाख अंगावर, जामापैरण दस्ती शिरमंदील शिरपेच, कंठी चौकडा ठाव देती वर मोत्यांचा तुरा चमकतो, दीपकांच्या ज्योती चुण्या करून पोशाख, म्हाळसा तबकामध्ये ठेविती डूब दागिण्यामध्ये, बानूबाई शृंगार रस नटती करून सोळा शृंगार, म्हाळसा पडद्यातून पाहती जामदार करी हारहरोहर हुकुमामध्ये राहती चालता गजर चरणी, शेष पाताळी डुलती ऐकुनिया नाद शिकवे, वर पारवे घुमती लखलखाट बिजल्यांचा, तारे स्वरूपांचे तुटती जरी पदराचा झोक शेलारी, निर्गुणची पिवळी केळी कर्दळीचा गाभा, म्हाळसा फुल चाफेकळी उठी लवकर मलुराय, म्हाळसा बोले प्रातःकाळी उटणे मी लाविते तुम्हाला, सण आज दिपवाळी ५ परमेश्वर शिवसांभ कृपाघन, सोमनाथ सोरटी शक्तीयुक्ती सर्वांग भूषणे, हिमगिरीजा गोरटी महांकाळ कंकाळ काळहर, काळ केशरी शिवा अष्टमुर्तीजा क्षणा शैल्यशिव, दुःख निवारक शिवा रेवा सहस्त्रवास, वासू देवकीचा निर्गुण निर्विकल्पा, निर्गुणा निष्कलंका तांडवा धीश देवा, विश्व पाताल पालका प्रथमनाथ मृत्युंजय, तारका विश्वेश्वर शम्भो सकलनायका लांछि फुलान्तक, मणी मल्लांतक विभो उठी लवकर मलुराय, म्हाळसा बोले प्रातःकाळी उटणे मी लाविते तुम्हाला, सण आज दिपवाळी. ६ त्रिभुवनी सभा घनदाट बैसले, देव तेहतीसकोटी आले नारद तुंबर सभेमध्ये, सांगती गोष्टी वाघ्या मुरुळ्यांचा हजर गजर, पुढे वाजती घाटी अनुहात गगनात चौघडे, यात्रेची दाटी गुरु मुकुंदराज प्रसन्न, गोडनाम बापूंच्या कंठी हरिभाऊची जोडी ऋणात्मक, वक्तशीर गाठी पूर्वीचे सुकृत फळा, आले हो शेवटी मलुनाम हे अक्षर भळा, लिहिले लल्लाटी माझे सहस्त्र अपराध, देवा घालावे पोटी करा कृपेची छाया जागा द्या, मज पायाजवळी हेच मागणे तुम्हा मागतो, नामा त्रिकाळी उठी लवकर मलुराय, म्हाळसा बोले प्रातःकाळी उटणे मी लाविते तुम्हाला, सण आज दिपवाळी.

मल्हारी पंचाक्षरी

धावपाव लवकरी दयाळा पठारच्या मल्हारी प्रभो तुम्ही जेजुरी च्या मल्हारी तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll धृ ll क क क क काय तुझे गुण वर्णावे दयाळा ख ख ख ख खंड्याचा हात भला रे तुजला ग ग ग ग गंग्या वारूवर स्वार रंग पिवळा घ घ घ घ घटका सोन्याची जाते अमृत वेळा न न न न नमस्कार हा लोळे चरणावरी तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll १ ll च च च च चमकतो वारू देखिला नयनी छ छ छ छ छाया कृपेची कर देवा येउनी ज ज ज ज जाई जुईंचे हार गुंफित बैसुनी झ झ झ झ झटकन देवा यावे त्वा धावूनी य य य येऊन निजसव स स सांभाळ करी तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll २ ll ट ट ट ट टाण टोण्याचा धरा भंडारावरी ठ ठ ठ ठ ठाण ठोकतो आहेस आमुच्या शिरी ड ड ड ड डवहंकार करू नको गर्व धरू अंतरी ढ ढ ढ ढ ढाल नामाची उभास भिंतीवरी न न न न नमस्कार हा लोळे चरणावरी तुझे गुण गातो हृदयी स्मरतो करून पंचाक्षरी ll ३ ll

मल्हारी करुणाष्टक

मल्हारी करुना करी मजवरी ताप त्रयाते हारी तारी या भवसागरी मजसी या रंकासी हाती धरी म्हाळसापती स्वामी राजसा पावसी मला सत्य भरवसा म्हणुनिया तुझी मांडली स्तुती पाव सत्वरे म्हाळसापती आस हि तुझी फार लागली, दे दया नी दे बुद्धी चांगली देऊ तू नको दुष्ट वासना, तूची आवरी आमुच्या मना वागवया सर्व सृष्टीला, शक्ती बा असे एक तुजला सर्व शक्ती तू सर्व देखणा, कोण जाणतो तुझिया गुणा माणसे आम्ही सर्व लेकरे, मायबाप तू हे असे खरे तुझिया कृपेवीण ईश्वरा, आसरा आम्हा नाही दुसरा म्हाळसापती स्वामी राजसा पावसी मला सत्य भरवसा म्हणुनिया तुझी मांडली स्तुती पाव सत्वरे म्हाळसापती...

कडेपठार देवतालिंग स्तवन

गिरीवरचे गिरीवर नायक पठारलिंगा, जेजुरलिंगा, आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll धृ ll पदी घालूनी बळकट मिठी, पहावी शोधूनी अंतरदृष्टी, प्रभूने रचला रचली सृष्टी त्यामध्ये भक्त जनांच्या भेटी होती सत्संगा, आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll १ ll शिवशिव नामामृत रस सार सेवन करावे वारंवार, जावे भवसागर उतरुनी पार भुक्ती मुक्तींचे दरबार रंगले रंगा, आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll २ ll धरुनी हृदयांतरी विश्वास, करुनि षडःकर्मांचा नाश, जावे भवबंधन तोडूनी पाश जगदीश पुरवतील आस मिटवतील दंगा, आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll ३ ll रामभाऊ सदा सेवाकरी महाली, गळयामध्ये घालूनिया भंडारी उभा असे सद्गुरुनाथांचे द्वारी कर जोडूनी मागतो वारी मिळूनी सत्संगा आदिशक्ती म्हाळसा बानू शोभती गंगा ll ४ ll

!!! जय मल्हार !!!